Home मुंबई महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल निवडणूक: प्रकाश आंबेडकरांची भूमिका लवकरच स्पष्ट; वकिलांकडून संपूर्ण पॅनेल...

महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल निवडणूक: प्रकाश आंबेडकरांची भूमिका लवकरच स्पष्ट; वकिलांकडून संपूर्ण पॅनेल साठी आग्रह

51
0

मुंबई: महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, कायदेतज्ज्ञांच्या या वर्तुळात सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वैयक्तिक उमेदवाराऐवजी संपूर्ण पॅनलला पाठिंबा द्यावा, अशी मागणी वकिलांकडून होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र, लवकरच यावर अधिकृत निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली की, फुले-शाहू-आंबेडकरी आणि मानवतावादी चळवळीत सक्रिय असलेले अनेक वकील त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. या कार्यकर्त्यांनी आग्रही मागणी केली आहे की,
निवडणुकीत कोणत्याही एका वैयक्तिक उमेदवाराला पाठिंबा देऊ नये. जर पाठिंबा द्यायचा असेल, तर तो संपूर्ण पॅनलला दिला जावा, जेणेकरून संघटनेत धोरणात्मक बदल घडवून आणता येतील, असे त्यांनी सांगितले.

या संदर्भात आमचा विचार सुरू आहे. वकिलांच्या भावना आणि चळवळीचे हित लक्षात घेऊन लवकरच आमची भूमिका स्पष्ट करू, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

सध्या केवळ महाराष्ट्र आणि गोवाच नव्हे, तर देशातील विविध राज्यांच्या बार कौन्सिलच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने पार पडत आहेत. वकिलांच्या या सर्वोच्च संघटनांवर वर्चस्व मिळवण्यासाठी विविध संघटना आणि राजकीय विचारांचे गट सक्रिय झाले आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे आता कायदे क्षेत्रातील तज्ज्ञांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here