Home मुंबई *बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी रितू तावडे तर उप महापौर पदासाठी संजय...

*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी रितू तावडे तर उप महापौर पदासाठी संजय घाडी यांचे नामांकन*

55
0

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बुधवार, दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या महापौर व उप महापौर पदाच्या निवडणुकीसाठी, महापौर पदाकरिता प्रभाग क्रमांक १३२ च्या नगरसेविका रितू तावडे व उप महापौर पदासाठी प्रभाग क्रमांक ५ चे नगरसेवक संजय घाडी यांनी आपले नामांकन अर्ज महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे यांच्याकडे शनिवार दि७ फेब्रुवारी २०२६ रोजी दाखल केला.

यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आ. अमित साटम, भाजपचे गटनेते गणेश खणकर, माजी खा. राहुल शेवाळे, माजी खा. मनोज कोटक, नगरसेवक प्रभाकर शिंदे आदींसह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here