Home मुंबई राज्यातल्या ९ महानगरपालिकांना मिळाले महापौर !

राज्यातल्या ९ महानगरपालिकांना मिळाले महापौर !

51
0

मुंबई: राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये शुक्रवारी महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या निवडणूक प्रक्रिया पार पडल्या.
पिंपरी-चिंचवड, नाशिक ,अहिल्यानगर,जळगाव, धुळे, कोल्हापूर, , नागपूर, अमरावती, सोलापूर या महानगरपालिकांमध्ये महापौर निवड प्रक्रिया पुर्ण झाल्या आहेत.
यात काही ठिकाणी लढती चुरशीच्या होतील असा अंदाज असताना निवडी शेवटी बिनविरोध झाल्या. .
सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना आणि एमआयएमच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने कोंड्याल यांचा मार्ग मोकळा झाला. जळगाव महानगरपालिकेत भाजपच्या दीपमाला काळे यांची महापौरपदी निवड झाली असून शिवसेनेच्या मनोज चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. दीपमाला काळे यांनी जळगाव महापालिकेच्या १७व्या महापौर म्हणून पदभार स्वीकारला.

नागपूर महानगरपालिकेत भाजपच्या नीता ठाकरे यांनी १०४ मते मिळवत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. धुळे महानगरपालिकेत तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत भाजपच्या मायादेवी परदेशी यांना ५० मते मिळून महापौरपदावर विजयी झाल्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेच्या संयुक्त उमेदवाराला १३ मते मिळाली.
नांदेड महानगरपालिकेत प्रथमच भाजपचा महापौर निवडून आला आहे. ८१ पैकी ४५ जागा जिंकून भाजपने बहुमत मिळवत महापौरपदासाठी कविता मुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाली. उपमहापौरपदासाठी दिपकसिंह रावत यांची निवड झाली.
सोलापूरमध्ये महापौरपदी विनायक कोंड्याल (भाजप) यांची निवड झाली . जळगावमध्ये दीपमाला काळे (भाजप) महापौर तर मनोज चौधरी (शिवसेना) उपमहापौर तर अहिल्यानगरमध्ये ज्योती गाडे (राष्ट्रवादी-एपी) महापौर तर धनंजय जाधव (भाजप) उपमहापौर, नागपूरमध्ये नीता ठाकरे (भाजप) महापौर असून उपमहापौरपदी लीला हाथीबेड यांची निवड झाली
– पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे रवी लांडगे, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर (भाजप) यांची निवड झाली आहे. कोल्हापुरात रुपाराणी निकम (भाजप) महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.
संभाजीनगरमध्ये समीर राजूरकर (भाजप) महापौर आणि राजेंद्र जंजाळ (शिवसेना-शिंदे) उपमहापौर पदी निवड झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here