Home मुंबई *महापारेषणमध्ये महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात*

*महापारेषणमध्ये महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात*

83
0

*आरोग्य, आर्थिक नियोजन व योगावर मार्गदर्शन*

मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) यांच्या वतीने महिलांसाठी आयोजिलेला पारंपरिक हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. अपर जिल्हाधिकारी तथा कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास व्यासपीठावर संचालक (वित्त) तृप्ती मुधोळकर, मुख्य अभियंता जुईली वाघ, वंदना निंबाळकर, आहारतज्ज्ञ भरतकुमार परिहार, आर्थिक सल्लागार रिंकी सिंह, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या राधिका कोप्पीकर तसेच मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील, जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आहारतज्ज्ञ भरतकुमार परिहार यांनी संतुलित आहार व आरोग्यदायी जीवनशैली याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आर्थिक सल्लागार रिंकी सिंह यांनी आर्थिक नियोजन व बचतीचे महत्त्व विशद केले. पुढे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या राधिका कोप्पीकर यांनी ध्यान, प्राणायाम व योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.

कार्यक्रमात सांस्कृतिक रंगत आणत स्मिता वंजारी व कीर्ती देशमुख यांनी सादर केलेली नाटिका उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरली. महापारेषणच्या महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून आरोग्य, आर्थिक साक्षरता आणि मानसिक शांततेचा सकारात्मक संदेश देण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी स्मिता वंजारी, सुनील गडलिंग, तेजस टिकले, लोटन वळवी, रोशन झुगरे, स्मिता पाठारे व स्नेहल बोंद्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी तेरकर, रिटा सुरडकर व कविता महाजन यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here