गणेश नाईक यांना लढण्याची परवानगी द्याच!
खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून महायुतीमधील सहकारी आणि भाजप आमदार गणेश नाईक यांच्याबद्दल तक्रार केली आहे.
या पत्रात,मंत्री गणेश नाईक हे जाणीवपूर्वक शिवसेनेला (एकनाथ शिंदे ) नव्या मुंबईतून संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे.
नेत्यांची अवमानना करत असून नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार डिवचल्याचे आणि नवी मुंबईत शिवसेनेला ‘धोबीपछाड’ देण्याच्या वल्गना केल्याचे पत्रात म्हटले आहे.
महायुती धर्माचे उल्लंघन केले असून युती म्हणून एकत्र निवडणूक लढवून आणि सत्तेत असूनही मित्रपक्षाला संपवण्याचे राजकारण नाईक करत आहेत, अशी तक्रार म्हस्के यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे केली आहे.
संघर्षाला आम्हीही तयार आहोत, नाईक यांना परवानगी द्याच शिवसेनेचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्यालाही त्यांच्या विरोधात मैदानात उतरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.


















