*व्यंगचित्रकार प्रशांत आष्टिकर यांची पोलिसात तक्रार!*
निवडणुक आयोगाने कोरस इंडिया कंपनीचे १० रूपयांचे मार्कर वापरून दुबार मतदानाला मदत केली. या पुर्वी ‘परमनंट वॉटर फ्रुप रोटरी इंक’ जी जर्मनीत तयार होते ती वापरली जात होती. तीची आता २३ एम.एलची किंमत ५०० रू ते ५५०रू आहे. ती फक्त जर्मनीत तयार होते.
या गुन्हयाबाबत आम्ही महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक दाते यांच्याकडे
लेखी तक्रार केली आहे . अशी माहिती प्रख्यात व्यंगचित्रकार प्रशांत अष्टिकर यांनी आपल्या फेसबुक या समाजमाध्यमावर दिली आहे.
याबाबत विचारले असता प्रशांत अष्टेकर म्हणाले की ” कालपर्यंत निवडणुकीसाठी कायम वाॅटरप्रुफ असणारी रोटरी इंक वापरली जात होती, जी पर्मनंट वाॅटरप्रुफ आहे. मग यावेळेस मतदानासाठी १०/५₹ चे साधे मार्कर पेन का वापरण्यात आले? ज्याची शाई पुसली जाते.
हे दुबार मतदानास सहकार्य करण्यासाठी नियोजनबध्द केलेले षडयंत्र आहे.
एक जबाबदार नागरीक म्हणून मी पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार केली आहे.
यात तक्रारीत या शाई व मार्कर पेनची खरेदी करणाऱ्या राज्य निवडणूक आयोग, राज्य सरकारवर आणि या लोकशाहीच्या उत्सवाची व जनतेची फसवणूक करणाऱ्या भयंकर रॅकेटवाल्यांवर कारवाई करण्याची आणि ही निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे.
आता या शाई व षडयंत्राविरोधात राज्यभरात जिल्ह्या जिल्ह्यात तक्रारी होतील.”
असेही ज्येष्ठ पत्रकार,व्यंगचित्रकार प्रशांत अष्टेकर यांनी स्पष्ट केले आहे.

















