Home मुंबई मुंबईत १ला दुबार मतदार सापडला वाॅर्ड क्र.१९२ मधे!

मुंबईत १ला दुबार मतदार सापडला वाॅर्ड क्र.१९२ मधे!

54
0

मनसेचे यशवंत किल्लेदार शिवसेने (शिंदे)च्या प्रिती पाटणकर यांच्यात लढत!

मुंबई: राज्यातल्या २९ महानगरपालिकांसाठी गुरुवारी सकाळी साडेसात ते साडेपाच दरम्यान नागरिकांना मतदान करता केले. मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या.
याचदरम्यान मुंबईतील महत्त्वाची माहिती समोर आली .
राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून दुबार मतदाराबाबत ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली होती. “दुबार मतदार दिसला, तर त्याला तिथेच फोडून टाका.” असे आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिले होते. यातच मतदानादरम्यान दादरमधील वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये मुंबईतील १ला दुबार मतदार आढळून आला .

वार्ड क्रमांक १९२ मधील मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी सकाळीच मतदानाचा अधिकार बजाविला. यशवंत किल्लेदार मतदान करण्यासाठी गेले असता, मतदान केंद्रावर दुबार मतदार ही आढळून आला. या दुबार यादीत असलेल्या महिला मतदाराला थांबविण्यात आले . तर आधारकार्ड पाहून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेऊन त्यांना मतदान करून दिले जाणार आहे असे समोर आले. यावर “ही सगळी निवडणूक आयोगाची चूक असल्याचे, यशवंत किल्लेदार यांनी सांगितले.
वार्ड क्रमांक १९२मध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार विरुद्ध शिवसेना शिंदे पक्षाच्या प्रीती पाटणकर यांच्यात लढत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here