Home Uncategorized ‘महिलेने नेतृत्व करु नये का? मनुवादी भाजपा बौध्द धर्मासारखे इतर धर्म, अल्पसंख्याक...

‘महिलेने नेतृत्व करु नये का? मनुवादी भाजपा बौध्द धर्मासारखे इतर धर्म, अल्पसंख्याक आणि महिलांच्या विरोधात आहे हे या व्हिडिओतून स्पष्ट होते.’

108
0

काँग्रेस चे प्रवक्ते सचिन सावंत यांनी × वर पोस्ट करुन मुंबई अध्यक्ष प्रा वर्षा गायकवाड यांच्यावर केलेल्या विडियोविरोधात प्रतिक्रिया दिली आहे

भाजपाच्या ट्रोल गँगने बौध्द धर्मिय असलेल्या मुंबई काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड @VarshaEGaikwad यांना एका व्हिडिओ द्वारे ‘वर्षा बेगम’ संबोधून त्यांचा धर्म बदलवून एका गरीब मुस्लिम व्यक्तीला त्या पक्षाचे तिकीट देत आहेत असे दाखवून त्यांच्यावर तुष्टीकरणाचा आरोप केला आहे. खरे तर सत्तेच्या राजकारणासाठी हिंदू धर्माचे नाव घेणाऱ्या @BJP4Mumbai चा हा हिंदू धर्माच्या दुष्टीकरणाचा प्रयत्न आहे. हिंदू धर्म हा सहिष्णू व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा वसुधैव कुटुंबकम् हे तत्वज्ञान जगाला सांगणारा धर्म आहे. या धर्माला असहिष्णू व दुष्ट ठरविण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.हा हिंदू धर्माचा अवमान आहे. एका मागासवर्गीय समाजातील महिला मुंबई काँग्रेसचे नेतृत्व करते ही खरी या मनुवाद्यांची पोटदुखी आहे. हे केवळ संविधानाने शक्य झाले. भाजपा ची मनुस्मृती असती तर ते शक्य झाले नसते. महिलेने नेतृत्व करु नये का? मनुवादी भाजपा बौध्द धर्मासारखे इतर धर्म, अल्पसंख्याक आणि महिलांच्या विरोधात आहे हे या व्हिडिओतून स्पष्ट होते.
x.com/i/status/20073…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here