Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला! अंगावर काळे...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला! अंगावर काळे फेकले !

70
0

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला आहे. कार्यक्रमाच्या स्थळीच हा हल्ला झाला आहे.

सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाला आहे. कार्यक्रमाच्या स्थळीच हा हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन नुकतेच झालेले आहे. काही लोकांनी एकत्र येऊन हा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे.नंंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले
आणि या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. ९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. अशातच हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
विनोद कुलकर्णी यांनी स्वत: घडलेल्या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले की, ”मी प्रकाशन कट्ट्यावर पुस्तकांचे प्रकाशन करून बाहेर पडत होतो. माझ्या डोळ्यात केमिकलसारखे काहीतरी टाकण्यात आले.तुला संपवतो अशी भाषा वापरण्यात आली. मी त्याच्यातून बचावलो.”

सातारा शहरात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रासह देशभरातून नामवंत साहित्यिक, प्रकाशक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मात्र, या संमेलनाचे वैशिष्ट्य केवळ उपस्थितीपुरते मर्यादित नसून, अनेक अनोखे पैलू यानिमित्ताने अनुभवता येणार आहेत. या संमेलनाची सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे दिल्लीत पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर या साताऱ्यात तब्बल पाच दिवस मुक्काम करणार आहेत. त्यांच्या दीर्घ उपस्थितीमुळे विविध वैचारिक चर्चा, संवाद आणि साहित्यविषयक उपक्रमांना विशेष उंची मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here