Home मुंबई मराठी चित्रपट सुवर्णयुगातील लखलखती शलाका अभिनेत्री संध्या! चित्रपतींची हुकुमाची राणी काळाच्या पडद्याआड!

मराठी चित्रपट सुवर्णयुगातील लखलखती शलाका अभिनेत्री संध्या! चित्रपतींची हुकुमाची राणी काळाच्या पडद्याआड!

99
0

पिंजरा, दो आखे बारा हात, नवरंग फेम दिग्गज अभिनेत्री संध्या शांताराम
(माहेरचं नाव विजया श्रीधर देशमुख)
यांचे वयाच्या ८४ वर्षी शुक्रवारी रात्री उशिरा मुंबईत निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा परळ येथील राजकमल स्टुडिओमधून नेण्यात आली. छत्रपती शिवाजी पार्क येथील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
संध्या शांताराम यांचा जन्म २२ सप्टेंबर १९३२ चा.
उंचापुरा सडसडीत बांधा,गौरवर्ण, चपलख अभिनय ,नजरेत धार, मानेत यंत्र असावं अशी नृत्यातील कसब..कसदार आवाज आणि चित्रपती व्ही शांताराम यांच्या चित्रपटातील हुकुमाची राणी अशी विशेष ओळख!
मुळच्या कोल्हापूरच्या, बहिण वत्सलासह त्या मुंबईत आल्या.
अभिनेत्री रंजना यांची ही संध्या मावशी!
संंध्या म्हणजे मराठी चित्रपटांच्या सुवर्ण युगातील ‘लखलखती शलाका’!
ज्यांनी १९५०–१९७० च्या कालावधीत हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला.
चित्रपती व्ही शांताराम निर्माता यांच्या ३ऱ्या पत्नी होत्या.

‘अमर भोपाली’, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आँखें बारह हाथ’, ‘नवरंग’ आणि ‘पिंजरा’ या चित्रपटांमध्ये त्यांना महत्त्वाच्या भूमिका साकारल्या
‘पिंजरा’ या मराठी चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेने त्यांना विशेष ओळख मिळाली. चित्रपटाचा विषय, तमाशातली बाई गुरुजीला जाळ्यात ओढते, ‘ पाय लचकला म्हणून पायाचं केलेलं दर्शन हा त्यावेळेस हिट नी हाॅट सिन ठरला,दमदार गाणीही हिट ठरली! पिंजरा हा मराठी चित्रपटांतील एक अमर कलाकृती मानली जाते.

संध्या यांनी नृत्याचं प्रशिक्षण घेतलं नव्हतं पण तरीही ‘झनक झनक पायल बाजे’साठी मेहनत घेऊन ती भूमिका उत्तम साकारली.
त्यांच्या ४६ वर्षांच्या अभिनय कारकीर्दीत त्यांनी फक्त १४ चित्रपटातील काम केले.

व्ही शांताराम यांच्याशी ३ऱ्या पत्नी म्हणून लग्न केले, त्यावेळी त्यांच्यात ३७ वर्षांचं अंतर होतं.
त्यांना त्यांचं असं राजकमल स्टुडिओत वेगळं आदराचं स्थान व्हिडिओ शांताराम असताना होतं,ते गेल्यानंंतरही कायम राहिलं.
या कलापुरच्या तेजस्वी चित्रशलाकेला मानाचा दंडवत आणि भावपुर्ण श्रध्दांजली!
*****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here