ठाणे -:
येत्या नवरात्रीमध्ये देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी एसटी च्या ठाणे विभागाने स्पेशल पॅकेज टूर्स जाहीर केले असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी धनंजय शिंदे यांनी सांगितले.
ठाणे -तुळजापुर, -पंढरपूर देवदर्शन असा हा दोन दिवसांचा प्रवास असेल व तसे नियोजन ठाणे विभागाने केलेले आहे . प्रवासासाठी साधी बस असेल .दि २१,२२,२७,व २८ सप्टेंबर या तारखांना सदर बसेस सकाळी ७ वा वंदना बस स्थानकावरून सुटतील व देवदर्शन करून दुसऱ्या दिवशी संध्याकाळ पर्यंत ठाण्यात परततील असे वाहतुक विभागाने स्पष्ट केले आहे .
तसेच भिवंडी बस स्थानक येथून ही एक दिवसीय अंबाडी ,वज्रेश्वरी मंदिर, गणेशपुरी महालक्ष्मी मंदिर, डहाणू ,जीवदानी मंदिर विरार व संध्याकाळी भिवंडी ला परत असा २२ ते ३० सप्टेंबर असे सलग नवरात्री चे नउ दिवस देवीच्या दर्शनासाठी एसटी उपलब्ध करून दिली आहे.भिवंडी स्थानकातुन सदर गाडी सकाळी ७ वा सुटेल व संध्याकाळी परतेल.
*सदर गाड्या संगणकीय आरक्षणा करिता उपलब्ध आहेत*.
*सदर पॅकेज टूर्स मध्ये फक्त प्रवास खर्च समाविष्ट असून प्रवासा दरम्यान होणारे इतर खर्च प्रवाशांनी स्वतः करावयाचा आहे*
*सदर पॅकेज टूर्समध्ये संगणकीय आरक्षण केलेल्या प्रवाशास शासनाने घोषित केलेल्या १५ टक्के तिकीट दरात सवलत तसेच एसटी च्या नियमानुसार मिळणाऱ्या इतर सर्व सवलती लागू राहतील*.
*सदरच्या पॅकेज टूर्स मध्ये ग्रुप बुकिंग व महिला बचत गट ज्यांच्यासाठी थेट ठिकाणाहून बस उपलब्ध होईल*
*कल्पना तुमची नियोजन आमचे एसटी ची विशेष योजना*
प्रवाशांचा ग्रुप असेल तर त्यांनी फक्त वेळ व दिनांक आम्हाला सांगावा तसे आम्ही नियोजन करु .सदर योजनेसाठी एसटी च्या नियमानुसार प्रवासी दर असतील असे ठाणे विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे



















