Home मुंबई *महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक...

*महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

81
0
  1. मुंबई :

(१५ सप्टेंबर) महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५’ अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर जाहीर केले आहेत. मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ७३ व ९६ नुसार शासनाला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला असून, तो तात्काळ लागू होणार आहे.

*ठरवलेले भाडेदर*

बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी प्रति किलोमीटर ₹ १०.२७ प्रमाणे प्रवासी भाडे आकारले जाईल. याशिवाय पहिला टप्पा १.५ किमी चा असुन प्राथमिक भाडे ₹ १५/- इतके अनिवार्य असेल. म्हणजेच प्रवास कितीही छोटा असो, किमान ₹१५ आकारले जाणार असून, त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला ₹१०.२७ प्रमाणे दर लागू होईल.

*परवाना व कार्यक्षेत्र*

राज्य परिवहन प्राधिकरणाने ३ प्रमुख कंपन्यांना (मे. उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि., मे. रॅपिडो ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. व मे. अॅनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि.) तात्पुरता ‘मुंबई महानगर क्षेत्रासाठी प्राव्हिजनल लायसन्स’मंजूर केला आहे.

या परवान्याची मुदत ३० दिवसांची असून, त्यानंतर अंतिम लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल.

तात्पुरत्या परवान्यातील सर्व अटी-शर्ती मान्य करूनच कंपन्यांना पुढील परवाना देण्यात येईल.

*राज्य सरकारचा उद्देश*

या निर्णयामुळे प्रवाशांना स्वस्त, सोयीस्कर व पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींच्या माध्यमातून वाहतुकीवरील ताण कमी होऊन, प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होईल.” असा विश्वास राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

📌 थोडक्यात

किमान भाडे – ₹१५/-

त्यानंतर प्रति किलोमीटर दर – ₹१०.२७/-

सध्या उबेर, रॅपिडो व अॅनी टेक्नॉलॉजीज या कंपन्यांना परवाना

मुंबई महानगर क्षेत्रात प्रायोगिकरित्या सेवा सुरू होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here