मुंबई – शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार दक्षिण मुंबईसाठी शिवसेनेच्या नव्या संघटनात्मक प्रभारी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, गणेश सानप, प्रविण कोकाटे आणि नीलम पवार, रेखा सुरणकर यांची विभागप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर बाळासाहेब भवन, मुंबई येथे अभिनंदन समारंभाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरूवात शिवछत्रपती तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पून तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिवादन करून करण्यात आले.
शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, उपनेते सुनील नरसाळे, शिवसेना माध्यम समन्वयक विधानसभा संघटक प्रमोद वांद्रेकर, विजय वाडकर तसेच शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख तसेच महिला सेनेच्या सर्व पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
नवीन नियुक्त झालेल्या विभागप्रमुखांचा शिवसैनिकांकडून जल्लोषात अभिनंदन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी शिवसेनेचा जयघोष करत आपला उत्साह व्यक्त केला.
मीनाताई कांबळी यांनी आपल्या भाषणात म्हणाल्या, “दक्षिण मुंबईसारख्या महत्त्वाच्या भागासाठी ह्या नेमणूका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीसाठी नव्या नेतृत्वाची गरज होती आणि ती गरज या नियुक्त्यांमुळे पूर्ण झाली आहे.”
या कार्यक्रमात अनेक शिवसैनिक, पदाधिकारी, महिला आघाडीच्या सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसैनिकांमधील वातावरण उत्साहपूर्ण आणि एकात्मतेचे दिसून आले.

















