Home Uncategorized जागर अभिजात मराठीचा मधे ‘मराठी भाषा वाचन स्पर्धे ‘चे आयोजन

जागर अभिजात मराठीचा मधे ‘मराठी भाषा वाचन स्पर्धे ‘चे आयोजन

59
0

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या गोष्टीला ३ ऑक्टोबर २०२५ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील ‘आरती आर्ट अकादमी’ जी गेली २३ वर्ष सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे त्या संस्थेतर्फे *जागर अभिजात मराठीचा* या कार्यक्रमा अंतर्गत मराठी भाषा वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.

ही स्पर्धा १४ वर्षांवरील वयोगटातील सर्वांसाठी खुली स्पर्धा आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी शुक्रवार २६ सप्टेंबर रोजी बोरवली येथे होणार आहे, तर अंतिम फेरी ३ ऑक्टोबर २०२५ रोजी बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे (जयवंत दळवी लघु ) नाट्यगृहात होणार आहे.
स्पर्धेसाठी रुपये ५०००/-,३०००/-,१००० आणि उत्तेजनार्थ रुपये ५०० ची दोन रोख बक्षिसे आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे .
जयवंत दळवी, शं ना नवरे,
व पु काळे, पु ल देशपांडे, शंकर पाटील, द मा मिरासदार यापैकी कुठल्याही लेखकाची कथा अथवा लेख यांचे ५ ते ७ मिनिटाच्या कालावधीत वाचन करायचे आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश फी रुपये १००/- आहे.
स्पर्धेची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी पुढील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष /विश्वस्त प्रदीप कबरे यांनी केले आहे.
संपर्क: ९९२०३ ९९८७९
९८२०६ ६३७१२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here