Home Uncategorized *शारीरिक व मानसिक स्वास्थ्य देणारे पारंपरिक देशी खेळ, संस्कृती संवर्धनाचे माध्यम –...

*शारीरिक व मानसिक स्वास्थ्य देणारे पारंपरिक देशी खेळ, संस्कृती संवर्धनाचे माध्यम – सभापती राम शिंदे*

98
0

​महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पारंपरिक क्रीडा महाकुंभ भरवणार – ना. मंगलप्रभात लोढा

मुंबई

“​परंपरागत देशी​ खेळ केवळ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारे​च नाहीत तर या खेळांमुळे संस्कृती संवर्धनाचे बहुमूल्य कामही होत राहील.” असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केले आहे. कुर्ला येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ​मैदाना’त आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभा​चा ​आज शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण आणि समारोप करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त​ १३ ऑगस्टपासून क्रीडा भारतीच्या सहयोगाने या पारंपरिक क्रीडा महाकुंभचे ​आयोजन करण्यात आले होते.

शिवकालीन खेळांना प्रोत्साहन देऊन नव्या पिढी पर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचवण्यासाठी ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव परंपरागत देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभा​चे आयोजन करण्यात आले. परंपरागत खेळांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात परंपरागत देशी खेळांचे आयोजन केले जाईल.” असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा ​यांनी यावेळी सांगितले. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री राज चौधरी, क्रीडा भारतीचे अध्यक्ष गणेश देवरुखकर, मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक मनोज रेड्डी यावेळी उपस्थित होते.

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले की, “कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता​ मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या माध्यमाने तन-मनाने सुदृढ करणाऱ्या​ परंपरागत खेळांच्या क्रीडा महाकुंभा​चे आयोजन करण्यात आले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर देशी खेळांचे मैदान​ अल्पावधीत उभारल्याबाबत​ही त्यां​चे आभार मानतो. ”
परंपरागत देशी खेळ सामान्यतः ग्रामीण भागात खेळले जातात, मात्र लोढा यांनी मुंबई सारख्या शहरात या खेळांचे आयोजन करून खऱ्या अर्थाने देशी खेळांना पुनरुजीवित केले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here