Home Uncategorized शिक्षणाच्या उद्देशाने झपाटलेला विद्यार्थी पोलादपूर तालुक्यात तयार झाला पाहिजे – आ. प्रविण...

शिक्षणाच्या उद्देशाने झपाटलेला विद्यार्थी पोलादपूर तालुक्यात तयार झाला पाहिजे – आ. प्रविण दरेकर

114
0

*पोलादपूर तालुका धाडसी नरवीरांची भूमी,
पुन्हा नव्याने इतिहास उजळण्याची गरज*

पोलादपूर – “ही आपली धाडसी नरवीर तानाजी मालुसरे यांची भूमी आहे. धाडस काय असते हे पोलादपूर तालुक्यातील माणसाला सांगायची गरज नाही. पुन्हा इतिहास नव्याने उजळण्याची गरज आहे. ते काम तरुण पिढीने करावे. ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षणाच्या बाबतीत अडचण येईल त्यांच्या पाठीशी उभे राहू”, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी दिला.
कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्था कोतवालच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आणि माध्यमिक शाळेतील २० खेळाडूंना मोफत स्पोर्ट्स गणवेश वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात आ. दरेकर बोलत होते.
“शिक्षणाला पैसा लागत नाही. शिक्षणासाठी चांगला अभ्यास केला पाहिजे. शिक्षणाच्या उद्देशाने झपाटलेला विद्यार्थी आपल्या पोलादपूर तालुक्यात तयार झाला पाहिजे”, असे आवाहन भाजपा गटनेते आणि पोलादपूर तालुक्याचे भूमिपूत्र आ. प्रविण दरेकर यांनी विद्यार्थी वर्गाला केले.

सदर कार्यक्रमाला भाजपा रायगड सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, भाजपा स्थानिक नेते प्रसन्न पलांडे, भाजपा तालुकाध्यक्ष वैभव चांदे, शिवसेनेचे निलेश अहिरे, तालुक्याच्या गटविकास अधिकारी दीप्ती गाट, कृष्णा दरेकर, अनिल मोरे, कोतवालच्या सरपंच रेखा दळवी, अविनाश शिंदे, निलेश तळवटकर, जमीर धामणकर, रामदास कळंबे, संदीप ठोंबरे, गोविंद चोरगे, संदेश कांबळे, श्रीधर जाधव, कार्यक्रमाचे आयोजक राजेश सकपाळ यांसह मोठ्या संख्येने तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी आणि पालक वर्ग उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना आ. दरेकर म्हणाले की, “माझ्या मनात खंत आहे कि माझ्या तालुक्याचा ज्या पद्धतीने सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे, तशा प्रकारचे नियोजनबद्ध व दिशादर्शक काम झाले नाही. मागासलेल्या तालुक्याचा शिक्का मी ज्या मातीतून आलो त्यावर आहे. आमच्यावेळी मार्गदर्शन, मदतीचा हात नव्हता. परंतु आज तुमच्यामागे मी पूर्ण ताकदीने उभा आहे”, असा विश्वासही दरेकर यांनी दिला.

दरेकर पुढे म्हणाले की, “ज्याला शिकायची वानवा होती त्याच प्रविण दरेकरने जिल्हा बँकेच्या माध्यमातून राज्यातील अनेक शिक्षण संस्थांना ताकद दिली. त्या संस्था शिक्षण दानाचे काम करताहेत. ”
जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांसाठी वेगळ्या योजना, संकल्पना मनात आहेत. जिल्हा परिषद, सरकार आणि सीएसआरच्या माध्यमातून या मुलांना उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय शिक्षण कसे देता येईल याचे नियोजन येत्या काळात केले जाणार असल्याचेही दरेकर म्हणाले.

 

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here