Home संमेलन / अधिवेशन / सण / उत्सव अनोखे रक्षाबंधन …’वृक्षाबंधन’

अनोखे रक्षाबंधन …’वृक्षाबंधन’

121
0

सातारा : ग्रामपंचायत कसबे पाचवड ता. वाई जि. सातारा आणि महात्मा गांधी विद्यालय पाचवड यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत स्तरीय ‘माझी वसुंधरा अभियान’ हा कार्यक्रम राबविण्यात आला. त्याप्रसंगी पाचवड गावचे सरपंच महेश गायकवाड ग्रामसेवक कोळी , अमृतवाडी गावचे सरपंच सचिन रत्नपरखी तसेच इतर सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुल्ला मॅडम, पर्यवेक्षिका तावरे मॅडम, पवार, सोनावणे आदि मान्यवर उपस्थित होते.गुरुकुल प्रमुख साधना पाटोळे यांनी विद्यालयातील विद्यार्थिनींकडून ‘इको फ्रेंडली राख्या’ तयार करून घेतल्या आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झाडांना राख्या बांधून अनोखे ‘वृक्षाबंधन’ साजरे केले “वृक्षाप्रती’ आदर व्यक्त करून ‘माझा गाव माझा अभिमान’ उपक्रमात सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here