*मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात छाननीअंती १५ वैध उमेदवार*
मुंबई, : मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या छाननीत १५ उमेदवारांचे अर्ज वैध तर १७ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. या मतदारसंघासाठी ३२ उमेदवारांनी ४१ नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते.
छाननीअंती वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी
१) अनिल यशवंत देसाई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२) राहुल रमेश शेवाळे – शिवसेना
३) विद्यासागर भिमराव विद्यागर – बहुजन समाज पार्टी
४) अबुल हसन अली हसन खान – वंचित बहुजन आघाडी
५) डॉ. अर्जुन महादेव मुरुडकर – भारतीय जवान किसान पार्टी
६) ईश्वर विलास ताथवडे – राष्ट्रीय महास्वराज भूमि पार्टी
७) करम हुसैन किताबुल्लाह खान – पीस पार्टी
८) जाहीद अली नासिर अहमद शेख – आजाद समाज पार्टी (कांशी राम)
९) दिपक एम. चौगुले – बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी
१०) महेंद्र तुळशीराम भिंगारदिवे – राईट टु रिकॉल पार्टी
११) सईद अहमद अब्दुल वाहिद चौधरी – सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया
१२) अश्विनी कुमार पाठक – अपक्ष
१३) आकाश लक्ष्मण खरटमल – अपक्ष
१४) विवेक यशवंत पाटील – अपक्ष
१५) संतोष पुंजीराम सांजकर – अपक्ष
*****


















