संजय राऊत यांच्याकडून स्वप्ना पाटकर यांचा छळ – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
स्वप्ना पाटकर यांचा संजय राऊत यांच्याकडून छळ होत असून त्यांचा जीविताला धोका आहे असे निवेदन शिवसेना नेत्या, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम
गोऱ्हे यांनी स्वप्ना पाटकर यांची पत्रकार परिषदेत बाजू मांडत संजय राऊतांवर गंभीर आरोप केले,तसेच उद्धव ठाकरेंनी याप्रकरणी दुर्लक्ष केल्याचे सांगितले.
स्वप्ना पाटकर यांना अधिक संरक्षण पुरवुन त्यांनी दाखल केलेल्या विविध गुन्ह्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विशेष पथक नेमुन तात्काळ चौकशी करणेबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे.



















