Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग आगामी काळात स्वयं पुनर्विकास अभियान पनवेलमध्ये ताकदीने गतीमान होईल*- *भाजपा गटनेते...

आगामी काळात स्वयं पुनर्विकास अभियान पनवेलमध्ये ताकदीने गतीमान होईल*- *भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे

149
0

*आगामी काळात स्वयं पुनर्विकास अभियान*

*पनवेलमध्ये ताकदीने गती घेताना दिसून येईल*

*भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे प्रतिपादन*

पनवेल- आगामी काळात स्वयं पुनर्विकास अभियान पनवेलमध्ये गती घेताना दिसून येईल, असे प्रतिपादन भाजपा गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केले आहे. पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादित यांच्या विद्यमाने व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने ‘सहकारी गृहनिर्माण संस्थाचा इमारतींचा स्वयंपुनर्विकास’ या विषयावर आज पनवेल येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमात आ. दरेकर बोलत होते.

याप्रसंगी पनवेल विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रशांत ठाकूर, विधानपरिषद आमदार विक्रांत पाटील, अविनाश कोळी, अरुणशेठ भगत, परेश ठाकूर, अनिल भगत, चारुशीला भगत, जयंत पगडे, नितीन पाटील, रविनाथ पाटील, विभागीय सहनिबंधक सहकारचे राजेंद्र पवार यांसह पनवेल येथील गृहनिर्माण संस्थांमधील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, एखादा विषय सर्वसामान्यांच्या चळवळीसाठी पुढे येतो आणि त्या विषयाच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांचा फायदा होतो. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न चांगले घर असावे ही पूर्तता करण्याची योजना समोर दिसत असताना, ती योजना माझ्याकडे का होऊ शकत नाही. मुंबईत या योजनेला मुहूर्तरूप मिळत असेल तर माझ्याकडे तसा प्रयत्न करूया या उद्देशाने प्रशांत ठाकूर यांनी माझ्याशी चर्चा केली. निश्चित येणाऱ्या काळात पनवेलमध्ये स्वयं पुनर्विकास हे अभियान ताकदीने गती घेईल, असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला.

दरेकर पुढे म्हणाले कि, स्वयं पुनर्विकास हे अभियान म्हणून पुढे येत आहे. स्वयं पुनर्विकास फार मोठी टेक्नॉलॉजी नाही. बिल्डर जो नफा कमावतो तो नफा बिल्डरऐवजी आपण सभासदांना जागेच्या, कॉर्पस फंडाच्या स्वरूपात वाटून घेतो. बिल्डर हा नफा कमाविण्यासाठी आलेला असतो. तर सोसायटीचे सभासद जास्तीचा फायदा, जागा मिळावी ही भावना घेऊन असतो. स्वयं पुनर्विकास ही चळवळ म्हणून उभी राहिलीय. या चळवळीला गती, ताकद आणि प्रोत्साहन देण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचेही दरेकर म्हणाले. तसेच गोरेगाव नेस्को येथे गृहनिर्माण संस्थांची परिषद घेतली. त्या परिषदेत २० निर्णयांपैकी १८ शासन निर्णय फडणवीस यांनी घेतल्याचेही दरेकरांनी उपस्थितांना सांगितले.

दरेकर पुढे म्हणाले कि, स्वयं पुनर्विकासाची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतःहून केलीय. याचा फायदा सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांना होत असल्याचे त्यांना दिसतेय. त्यांनी स्वयं पुनर्विकासाचे पालकत्व घेतलेय. पनवेलमध्ये स्वयं पुनर्विकास योजना शंभर टक्के यशस्वी करू. मुंबईत आज १५ इमारती स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून तीन वर्षात उभ्या राहिल्या असून लोकं चावी घेऊन राहायलाही गेली. शासनाकडून तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. पाच इमारती उभ्या करा, त्याला लागणार निधी मुंबई जिल्हा बँक देईल, असा विश्वासही दरेकर यांनी यावेळी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत योजना काढली. हे हौसिंगचे आत्मनिर्भर आहे. हौसिंग सोसायटीनी स्वतःचा पुनर्विकास स्वतः करा यासाठी शासन, बँक आणि अर्थव्यवस्था म्हणून लागेल ती मदत करू, असा शब्दही दरेकरांनी यावेळी दिला. तसेच स्वयं पुनर्विकास योजना सर्वदूर पासरायला लागलीय. नवी मुंबई, पनवेल येथे ही योजना यशस्वी करूया आणि मोठे सुसज्ज असे घर सामान्य माणसाला कसे मिळेल याची काळजी घेऊया. तुमच्या अपेक्षांना जराही ठेच लागणार नाही. आम्ही ताकदीने तुमच्या सोबत आहोत, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी उपस्थितांना दिला.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here