Home महाराष्ट्र हिंमत असेल तर चला आपण उध्दव ठाकरेंना जाब विचारायला जाऊ : आमदार...

हिंमत असेल तर चला आपण उध्दव ठाकरेंना जाब विचारायला जाऊ : आमदार चित्रा वाघ*

127
0

 

*हिंमत असेल तर चला आपण उध्दव ठाकरेंना जाब विचारायला जाऊ : आ चित्रा वाघ*

मुंबई : आज विधानपरिषेदमध्ये दिशा सालियन प्रकरणावर मनिषाताई कायंदे यांनी मुद्दा उपस्थित केला असता, आमदार चित्राताई वाघ यांनी एसआयटी रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी करत, पुन्हा या प्रकरणाचा तपास करण्यात यावा तसेच गुन्हेगार कितीही मोठा असला तरी त्याला कठोरात कठोर शिक्षा करा अशी मागणी केली.

नेमकी हीच गोष्ट विरोधकांना, विशेषतः उबाठा गटाच्या नेत्यांना झोंबली. यामुद्द्यावर चोख उत्तर देता येणार नाही म्हटल्यावर उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांनी सभागृहाची दिशाभूल करण्यासाठी पुजा चव्हाण प्रकरणावर भाष्य करत, चित्रा ताई वाघ यांना संजय राठोडांबाबत सवाल केला. तसेच त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली.

यावर आमदार चित्रा वाघ यांनी रणरागिणी होऊन सभागृह दणाणून सोडलं. जेव्हा कोणत्याही स्त्रिला तर्काने उत्तर देता येत नाही म्हटल्यावर पुरूष तिच्या मर्मावर तिच्या वैयक्तिक गौष्टींवर टीका करुन तिचे पाय खेचले जातात. हीच प्रचिती आज मंदिरासम सभागृहात आली.

यावेळी चित्राताई वाघ यांनी अनिल परबांना आव्हान केले की, “संजय राठोड यांना क्लीनचिट देणारे तुमचे उध्दव ठाकरे होते. मी पूजा चव्हाणला न्याय मिळावा म्हणून जीवाच्या आकांताने लढले, पण तुमच्या उध्दव साहेबांनी संजय राठोडला क्लीनचिट दिली नसती, तर ही वेळ आलीच नसती. हिंमत असेल तर चला आपण उध्दव ठाकरेंना जाब विचारायला जाऊ.”

दिशा सालियन हत्या प्रकरणात दिशाच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करताच या प्रकरणाचे पडसाद आज विधानपरिषद सभागृहात उमटले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी सभागृहात दिशा सालियान प्रकरणाचा पुन्हा सखोल तपास झाला पाहिजे अशी मागणी केली. यावर आमदार चित्राताई वाघ यांनी या प्रकरणात एसआयटीचा रिपोर्ट सार्वजनिक करण्याची मागणी केली. यावर विरोधी पक्षाचे नेते अनिल परब यांनी आदित्य ठाकरे यांना वाचविण्याचा पावित्रा घेत आमदार चित्रा वाघ यांना, पुजा चव्हाण प्रकरणात काय झाले असे विचारत चित्राताई वाघ यांना घेरण्याचा प्रयत्न करत आमदार मनिषा कायंदे यांच्यावर खालच्या शब्दांत आरोप केले.

यावर चित्राताईंनी उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांची चांगलीच खरटपट्टी काढली. एक वडील आपल्या मुलीसाठी न्याय मागत असताना विरोधक मात्र राजकीय बचाव तंत्रासाठी सभागृहातल्या महिलांचाच अपमान करतात. इतकंच नाही तर सभागृहात २० मार्च रोजी भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला असता विरोधकांनी घेतलेली भूमिका महिला विरोधी होती. हे चित्राताई वाघ यांनी निदर्शनास आणले.

एकंदरीतच गेल्या काही दिवसांत अधिवेशनामध्ये विरोधीपक्षाच्या नेत्यांकडून महिलांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न होतो आहे. संवेदनशील विषय मांडताना विरोधक त्याचे गांभीर्य लक्षात न घेता गोंधळ घालत आहेत. ही परिस्थिती चित्राताईंनी अधोरेखीत केली. विरोधक आमदार सभागृहात महिला आमदारांना अशी वागणूक देत असतील तर बाहेर समाजात वावरताना त्यांना महिलांबद्दल किती आदर असेल हे सत्य आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघड झालं आहे.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here