Home मुंबई मंत्रालयात ‘उजेडाच्या वाटेवर’ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महिलांच्या जीवनातील विविध पैलूंचे वास्तव उलगडले...

मंत्रालयात ‘उजेडाच्या वाटेवर’ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महिलांच्या जीवनातील विविध पैलूंचे वास्तव उलगडले छायाचित्रांतून

10
0

मंत्रालयात ‘उजेडाच्या वाटेवर’ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन
महिलांच्या जीवनातील विविध पैलूंचे वास्तव उलगडले छायाचित्रांतून

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने स्त्री जीवनातील विविध पैलू उलगडणारे आणि समाजाचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन अधिक सुदृढ करणारे ‘उजेडाच्या वाटेवर’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी दिली आहे. हे प्रदर्शन ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे सकाळी १० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.

महिलांच्या सक्षमीकरणाला समर्पित असलेल्या या प्रदर्शनातून विविध आर्थिक आणि सामाजिक स्तरांतील महिलांच्या जगण्याचे वास्तव छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. स्त्रियांचे अनुभव, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि त्यांच्या जीवनातील विविध पैलू यांची जाणीव करून देणारे हे प्रदर्शन समाजामध्ये महिलांविषयी संवेदनशील व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. या प्रदर्शनास आवर्जून भेट देऊन महिलांच्या जीवनातील विविध पैलू समजून घ्यावेत, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी केले आहे.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here