Home Uncategorized महिला सक्षमीकरणासाठी ‘स्त्री आधार केंद्रा’चे मोठे पाऊल

महिला सक्षमीकरणासाठी ‘स्त्री आधार केंद्रा’चे मोठे पाऊल

117
0

*विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात कृतीसत्राचे आयोजन*

मुंबई, ६ फेब्रुवारी २०२५ : महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या स्त्री आधार केंद्राच्यावतीने ६ फेब्रुवारी २०२५ रोजी कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात येईल. ‘विकासासाठी निरंतर वाटचाल : बीजिंग चौथ्या विश्व संमेलनानंतरची तीस वर्षे’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात महिला धोरण, आरोग्य, शिक्षण, रोजगार, हिंसाचारविरोधी उपाययोजना आणि लिंग समभाव यासंबंधी महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता स्वागत आणि परिचयाने होईल. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यावेळी प्रास्ताविकातून कृतीसत्राची भूमिका स्पष्ट करतील.

स्त्री आधार केंद्र, पुणे, बालहक्क आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई, सुलभ स्वच्छता मिशन फाऊंडेशन, मुंबई आणि महाराष्ट्र दुष्काळ निवारण व मदत कार्यक्रम, पुणे या चार संस्थांनी संयुक्तपणे या कृतीसत्राचे संयोजन केले आहे.

यावेळी, जागतिक महिला आयोग ६९, चौथे महिला धोरण आणि महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण (CWS-६९) याविषयी सखोल चर्चा करण्यात येणार आहे. विशेषतः महिला व मुलींचे आरोग्य, मासिक पाळी व रजोनिवृत्तीच्या समस्या, ग्रामीण व नागरी भागातील रोजगार, कौशल्य विकास, बालकांविरोधी हिंसाचार प्रतिबंध आणि महिलांसाठी न्याय प्रणालीतील सुधारणा या विषयांवर तज्ज्ञ आपले विचार मांडतील.

या कृतीसत्रात शिक्षण, आरोग्य, मानवी हक्क, दारिद्र्य, अर्थव्यवस्था, पर्यावरण, कृषी, महिला आणि माध्यम,, तसेच महिलांचा सत्ता निर्णय प्रक्रियेत सहभाग प्रमुख विषयांवर गटचर्चा होणार आहे.

*महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती आणि मार्गदर्शन*

या कृतीसत्राला सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. ना. प्रकाश आबिटकर राज्यमंत्री मा. ना. मेघना बोर्डीकर, राष्ट्रीय महिला आंदोलन अभ्यासक डॉ. पाम रजपूत, चंदिगढ , विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. प्रवीण पडवळ, बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा, महिला व बालविकास विभाग उपायुक्त श्री राहुल मोरे, सुलभ इंटरनॅशनलच्या संचालक नीरजा भटनागर आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त श्रीमती जेहलम जोशी, अपर्णा पाठक उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.गटचर्चा सादरीकरणानंतर डॅा.अनधा सरपोतदार व शायना एन .सी. तसेच महिला आमदारांनी निमंत्रित केले आहे.

तसेच, इतर सामाजिक संस्थांचे निमंत्रित लोकप्रतिनिधी आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील कार्यकर्ते या कृतीसत्रात सहभागी होणार आहेत. *हे प्रसिद्ध पत्र केवळ निमंत्रितांसाठी आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here