सायंकालीन शपथविधीच्या आधी सिध्दीविनायक चरणी नतमस्तक!

महायुतीतील भाजप विधिमंडळ गटनेते आ देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी होणााऱ्या शपथविधी आधी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आशीर्वाद मागितला.

याप्रसंगी आमदार गिरीश महाजन , भाजप प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे, आ कालिदास कोळंबकर आणि इतर आमदार दर्शनार्थी होते.

त्याप्रसंगी न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर ( राज्यमंत्री दर्जा ) व आचार्य पवन त्रिपाठी – कोषाध्यक्ष यांनी श्रींची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले त्यावेळी न्यासाचे विश्वस्त भास्कर शेट्टी, जितेंद्र राऊत, महेश मुदलियार, सुदर्शन सांगळे उपस्थित होते.






















