शिवसेना उ बा ठा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची प्रतिक्रिया
महायुतीचा नोट जिहाद
मी आज तुळजापूरला दर्शनासाठी गेलेलो माझी पण बॅग आज तपासण्यात आली. काल नाशिक आज विनोद तावडेंकडे पैसे सापडले अश्या बातम्या येताहेत. अनिल देशमुखांवर जो दगड मारला तो कोणी शोधायचा? निवडणूक आयोगाने! माझ्याकडे कुठला पुरावा नाही. पण ज्या बातम्या येताहेत त्यानुसार तो “वोट जिहाद” आहे. निष्पक्षपणे निवडणूक आयोगाने यावर कारवाई करायला हवी. काल नाशिकला जो मिंधे गटाकडे पैसे मिळाल्याच्या बातम्या येताहेत त्यानुसार हा त्यांचा आपसातला गँगवाॅर असू शकतो. नाशिकला ज्यांच्याकडे पैसे मिळाले ते पळून गेले तावडे तावडीत सापडले असतील तर त्यांच्यावर सुध्दा कारवाई व्हावी. महाराष्ट्रातील जनता यावर निर्णय घेईल.




















