*एकनाथ शिंदेंचा ताफा अडवत काळ झेंडे दाखवले, गद्दार घोषणा दिल्या आणि आज ठाकरे गटात प्रवेश*
*साधू कटके यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी*
*मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाऱ्या संतोष कटके आणि साधू कटके यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे उद्या साकीनाका येथे निषेध आंदोलन*
मुंबई दि.१२ – मुंबई : विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असल्याने सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार प्रचार होताना दिसत आहे.
मात्र प्रचार करताना भर सभेत गोंधळ , तर एखादा नेता आक्षेपार्ह विधान करून चर्चेत येत आहे. अशावेळी संतोष कटके नावाच्या व्यक्तीने सोमवारी (११ नोव्हेंबर) मुंबईत मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवत काळे झेंडे दाखवले, गद्दार-गद्दार घोषणा दिल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या गाडीवर फटकाही मारला. यानंतर संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र आज संतोष कटके आणि त्यांच्या वडिलांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला . (Santosh Katke blocked Eknath Shinde car yesterday and today entered the Thackeray group)
दरम्यान रिपब्लिकन पक्षाचे उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष साधू कटके यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी साधू कटके आणि यांचे पुत्र संतोष कटके यांचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात येत असून साधू कटके आणि संतोष कटके वर कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागणी साठी उद्या बुधवार दि .१३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने साकीनाका पोलीस ठाण्यावर तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाचे उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष साधू कटके यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची अधिकृत घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी केली आहे.
मुख्यमंत्रीपद संविधानिकपद आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती चे नेते आहेत.त्यांच्या विरुद्ध अपशब्द काढून त्यांचा अवमान करण्याचा केलेला प्रयत्न हा अक्षम्य आहे.या अवमानकारक वक्तव्याबाबत साधू कटके आणि त्यांचा पुत्र संतोष कटके यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सन्मानासाठी रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरला असून उद्या साकीनाका पोलीस ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अवमान करणाऱ्या साधू कटके आणि संतोष कटके यांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.



















