Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 281 नामनिर्देशनपत्रांचे वाटप तर 6 उमेदवांरानी...

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात एकूण 281 नामनिर्देशनपत्रांचे वाटप तर 6 उमेदवांरानी सादर केले अर्ज

147
0

ठाणे,

ठाणे विधानसभा निवडणूक 2024 साठी नामनिर्देशन अर्जाचे वाटप करण्यास सुरूवात झाली असून आज 18 विधानसभा मतदारसंघातून एकूण 281 नामनिर्देशन पत्रांचे उमेदवारांना वाटप करण्यात आले आहे. तर 6 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले.
134 भिवंडी विधानसभा मतदारसंघ – 6 अर्ज, 135 – शहापूर (अ.ज.) विधानसभा मतदारसंघ – 13 अर्ज, 136 – भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ – 36 अर्ज, 137 – भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ – 22 अर्ज, 138 – कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ – 20 अर्ज, 139 – मुरबाड विधानसभा मतदारसंघ – 14 अर्ज, 140 – अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ – 6 अर्ज, 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ – 10 अर्ज, 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ – 25 अर्ज, 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघ – 9 अर्ज, 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – 28 अर्ज, 145 मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघ – 19 अर्ज, 146 – ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ – 24 अर्ज, 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ – 13 अर्ज, 148 – ठाणे विधानसभा मतदारसंघ – 11 अर्ज , 149 – कळवा – मुंब्रा विधानसभा मतदारसंघ – 16 अर्ज, 150 – ऐरोली विधानसभा मतदारसंघ – 0 अर्ज, 151 – बेलापूर विधानसभा मतदारसंघ – 9 अर्ज असे एकूण 281 अर्जाचे वाटप करण्यात आले.
तर 135 शहापूर अ.ज विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अविनाश यशंवत शिंगे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राहूल मुंडके यांच्याकडे सादर केला. 149 कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार श्रीम. वैजंता राजेंद्र पावशे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे दाखल केला. 142 कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून समता पार्टीचे उमेदवार तृनेश अरूण देवळेकर यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ यांच्याकडे सादर केला. 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मनोज दिलिप सयानी यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे सादर केला. तसेच 147 कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून समता पार्टीचे उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के- पाटील यांच्याकडे सादर केला. 143 डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून राईट टू रिकॉल पार्टीचे उमेदवार निलेश अरुण सानप यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे सादर केला.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here