Home Uncategorized मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार...

मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार -खासदार नरेश म्हस्के

130
0

ठाणे,

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दि. २४ ऑक्टोबर २०२४ ऐवजी सोमवार दि.२८ ऑक्टोबर २०२४ रोजी भरणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १४७ कोपरी पांचपाखाडी विधानसभा मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दि.२४ ऑक्टोबर २०२४ रोजी भरण्याचे निश्चित करण्यात आले होते. तथापि, महाराष्टातील शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज संबंधित विधानसभा क्षेत्रात भरावयाचे असल्याने दि.२४ ऑक्टोबर २०२४ रोजीचा दिवस रद्द करण्यात आला असून, *सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ०९.०० वाजता मा. एकनाथ संभाजी शिंदे* यांचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here