Home मनोरंजन साहित्य संघाचे नाट्यगौरव सन्मान जाहीर

साहित्य संघाचे नाट्यगौरव सन्मान जाहीर

122
0

पुरू बेर्डे, श्वेता पेंडसे,प्रदीप ओक,श्याम चव्हाण यांचा गौरव….
यंदाचे मुंबई मराठी साहित्य संघाचे गौरव सन्मान जाहीर झाले असून त्यात चतुरस्त्र रंगकर्मी पुरू बेर्डे,लेखिका अभिनेत्री डॉ श्वेता पेंडसे, अनेक संगीत नाटकांचे लेखक प्रदीप ओक, ख्यातनाम प्रकाश योजनाकार  श्याम चव्हाण, संगीत रंगभूमी वरील नवोदित कलाकार भाग्येश मराठे, डॉ गौरी पंडित , आदित्य पानवलकर(तबला), अस्तित्व चे लेखक,दिग्दर्शक स्वप्नील जाधव, आनंद पालव, संतोष भुवड,रंगमंच संस्था यांचा सन्मान होणार आहे . संस्थेचे संस्थापक डॉ अ ना भालेराव यांच्या स्मृतिदिनी २५ ऑगस्ट ‘२४ रोजी सायं. ५ वाजता अध्यक्ष अचला जोशी,ज्येष्ठ नटवर्य बाळ धुरी यांच्या हस्ते सन्मान वितरण सोहळा मुख्य रंगमंदिरात होईल. यावेळी अभिराम भडकमकर लिखित इन्शाअल्लाह ‘ या कादंबरीचे अभिवाचन स्वतः अभिराम,सुशील इनामदार,  सचिन सुरेश आणि स्वाती चिटणीस सादर करतील. तरी या कार्यक्रमास  रसिकांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन नाट्यशाखा कार्यवाह प्रमोद पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here