Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांना भावपूर्ण आदरांजली!*

*ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांना भावपूर्ण आदरांजली!*

8
0

*ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांना भावपूर्ण आदरांजली!*

ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे प्रताप आसबे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील एक अभ्यासू, निर्भीड अनुभवी आणि जातीपाती विरुध्द विचार स्पष्टपणे मांडणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले .

पत्रकारिता ही समाजाला दिशा देण्याचे प्रभावी साधन आहे, याची जाणीव आपल्या लिखाणातून कार्यातून करून देणाऱ्या प्रताप आसबे यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या लेखणीतून व्यक्त होणारी सामाजिक जाणीव, विचारांची प्रगल्भता आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेली बांधिलकी ही पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी प्रेरणादायी होती.

त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
त्यांचे कार्य आणि पत्रकारितेतील योगदान नव्या पिढीतील पत्रकारांना निश्चितच मार्गदर्शक ठरतील.

त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया सहभागी आहे.

प्रताप आसबे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

संस्थापक अध्यक्ष
शीतल हरीश करदेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here