कोल्हापूरमध्ये ‘बंटी’ पॅटर्नचा ऐतिहासिक विजय!
कोल्हापूरची भाग्यवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या नेतृत्वात मिळवलेल्या अभूतपूर्व आणि दणदणीत विजयाबद्दल सर्व नवनियुक्त संचालकांचे मनःपूर्वक अभिनंदन!
हा विजय केवळ एका दूधसंघाच्या निवडणुकीचा विजय नसून, तो कोल्हापूरची स्वायत्तता आणि अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी लढलेल्या ऐतिहासिक लढाईचा विजय आहे. गुजरातच्या ‘अमूल’ आणि महाशक्तींचे आक्रमण रोखण्यासाठी, कोणताही मोठा राजकीय पाठिंबा नसताना, सतेज पाटील यांनी एकट्याच्या हिमतीवर ही बलाढ्य लढाई लढून ‘गोकुळ’ महाशक्तींच्या घशात जाण्यापासून वाचवला आहे. त्यामुळे हा विजय कोल्हापूरच्या ५ लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वासाचा विजय आहे.
@satejp
#SatejPatil #winner






















