Home मुंबई *सावध ऐका पुढल्या हाका.. आज मुरबाड (माळशेज घाट) येथील आदिवासींच्या घरावर संकट...

*सावध ऐका पुढल्या हाका.. आज मुरबाड (माळशेज घाट) येथील आदिवासींच्या घरावर संकट आहे, उद्या तुमच्याही घरावर येऊ शकतं!*- विजय वडेट्टीवार

21
0

*सावध ऐका पुढल्या हाका.. आज मुरबाड (माळशेज घाट) येथील आदिवासींच्या घरावर संकट आहे, उद्या तुमच्याही घरावर येऊ शकतं!*- विजय वडेट्टीवार

ज्या महाराष्ट्रात आदिवासी बांधवांनी पिढ्यान्‌पिढ्या जंगल जपलं, त्याच महाराष्ट्रात आज त्यांच्या हक्काच्या घरांवर कारवाई का होत आहे? अवघ्या तीन महिन्यांच्या लेकराच्या डोक्यावरचं छप्परही हिरावलं जात असेल, तर हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही.

सरकारच्या या असंवेदनशील वागण्यावरून मला एक प्रश्न पडला आहे की, सरकार जनतेचं ‘मायबाप’ आहे की या सरकारचं मायबाप अदानी आहेत?
मोठमोठ्या उद्योगपतींचा आशीर्वादाचा हात आपल्या डोक्यावर राहावा, यासाठी गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त करणाऱ्या या सरकारला जनता एक दिवस नक्कीच उत्तर देईल!

या तीन तिघडा, महाराष्ट्र बिघड्या सरकारला माझा थेट सवाल आहे की विकासाच्या नावाखाली जंगलांचा बळी आणि गोरगरिबांचं विस्थापन होत असेल, तर हा कसला विकास? हळूहळू महाराष्ट्र उद्योगपतींच्या हातात देतच आहात, आता काय कायमचा गिळायला डाव आखलाय का?

महाराष्ट्र म्हणजे कुणाची खासगी मालमत्ता नाही! इथल्या जंगलांवर, जमिनीवर आणि माणसांच्या आयुष्यावर निर्णय घेताना त्यांच्या हक्कांना पायदळी तुडवता येणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, संबंधित कागदपत्रं सार्वजनिक करावीत आणि बाधित कुटुंबांना न्याय मिळावा, ही माझी ठाम मागणी आहे.

@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@SunetraA_Pawar
@mieknathshinde

#Murbad #MalshejGhat #AdivasiRights #TribalRights #SaveAdivasiHomes #StopEvictions #SaveForests

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here