Home तत्त्वज्ञान/ साहित्य नवरात्र विशेष – दिवस १ ला – शैलपुत्री!शैलपुत्री म्हणजे हिमालयाची लेक –...

नवरात्र विशेष – दिवस १ ला – शैलपुत्री!शैलपुत्री म्हणजे हिमालयाची लेक – पर्वताची कन्या! ती काय सांगते?*- प्रो. शीतल हरीश करदेकर

81
0

*MAI MEDIA 24 – नवरात्र विशेष – दिवस १ ला – शैलपुत्री -*

*लेखिका: प्रो. शीतल हरीश करदेकर*

—

*शैलपुत्री म्हणजे हिमालयाची लेक – पर्वताची कन्या! ती काय सांगते?*

*१. स्थिर रहा, हलू नका!*

पर्वत वादळातही हलत नाही. शैलपुत्री नंदीवर बसलीय – नंदी कधीच घाई करत नाही – हळू चालतो – पण प्रत्येक पाऊल जमिनीत घट्ट रोवतो!

*नवरात्रीत पहिला मान का?*

नवरात्री ही आत्मशक्ती जागृत करण्याची साधना. शरीरात ७ चक्र – पहिलं मूलाधार चक्र – पायाचा पाया. शैलपुत्री ही मूलाधाराची अधिष्ठात्री देवी. कोणत्याही कार्याची सुरुवात मुळापासून होते – म्हणून पहिल्या दिवशी तिचं आवाहन!

हिमालयासारखी उत्तुंग, पवित्र, न डगमगणारी ऊर्जा घेऊन ती येते – संकटातही नव्याने सुरुवात करण्याची प्रेरणा देते!

*रूपातून जीवनमूल्य:*

*१. वाहन नंदी – स्थिरता, संयम, कष्ट!* यशाला घाई नको – दृढता हवी!
*२. उजव्या हाती त्रिशूल -* सत्व, रज, तम – तीन दुःख – शारीरिक, मानसिक, दैविक – भीती नष्ट करते!
*३. डाव्या हाती कमळ -* चिखलात उमलतं – पण डाग नाही – संसारात राहून मोहात न अडकता जगणं!
*४. कपाळावर चंद्रकोर -* मनाचा कारक चंद्र – मन शांत, शीतल, प्रफुल्लित!

*आजच्या स्त्रीला ३ संदेश -*

*१. कपड्यांचा रंग नाही – मनाचा रंग बदला!* आज पांढरा – आज पिवळा – कपडे मॅच करण्यात वेळ – पण साडी नाही – मन पांढरं करा – विचार सोन्यासारखे शुद्ध व्हावं!

*२. मुळं घट्ट धरा – फांद्या नव्हे!* आपण लाईक्स, फॉलोअर्स – बाह्य सुखाच्या फांद्यांमागे – पण स्त्रीचं खरं मूळ – शिक्षण, कौशल्य, स्वाभिमान, विचार! नोकरी गेली – नातं तुटलं – तरी मुळं घट्ट असतील – तर पर्वत कोसळत नाही!

*३. माऊलींसारखं निर्लेप प्रेम!* ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला मायेने ज्ञान दिलं – तसंच ऑफिसमध्ये, स्वयंपाकघरात – शक्ती रूप बनून जगा!

*थोडक्यात – आधी स्वतः स्थिर व्हा – मुळाशी घट्ट रहा – मगच उंच भरारी घ्या!*

*ॐ देवी शैलपुत्र्यै नमः॥*

—

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here