Home मुंबई *जागतिक पर्यटन दिन स्पेशल | ‘डेक्कन ओडिसी’ नव्या रूपात धावली! आता QR...

*जागतिक पर्यटन दिन स्पेशल | ‘डेक्कन ओडिसी’ नव्या रूपात धावली! आता QR कोडवर महाराष्ट्राचा इतिहास*

49
0

*जागतिक पर्यटन दिन स्पेशल | ‘डेक्कन ओडिसी’ नव्या रूपात धावली! आता QR कोडवर महाराष्ट्राचा इतिहास*

*मुंबई, दि. २७:* जागतिक पर्यटन दिनाच्या (२७ सप्टेंबर) पूर्वसंध्येला महाराष्ट्राची शान असलेल्या *‘डेक्कन ओडिसी’* या लक्झरी रेल्वेने २०२६-२७ हंगामातील पहिली सफर सुरू केली. मुंबईच्या CSMT वर MTDC च्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या शाही रेल्वेला विशेष भेट दिली.

*नवीन हंगामात काय आहे खास?*

✨ *नवा लूक:* ‘डेक्कन ओडिसी’ला नवं आकर्षक Vinyl Wrap
✨ *महाराष्ट्राची नावं:* प्रत्येक कोचला महाराष्ट्राच्या वारशाशी जोडलेली नावं – संस्कृतीचा थेट अनुभव
✨ *QR कोडची कमाल:* प्रत्येक कोचमध्ये आणि कॅबिन Keychain वर QR Code! स्कॅन करताच त्या प्रदेशाचा इतिहास, खाद्यसंस्कृती, पर्यटनस्थळे, वैशिष्ट्ये मोबाईलवर
✨ *शाश्वत पर्यटन:* प्रामुख्याने विजेवर धावणारी, पर्यावरणपूरक लक्झरी ट्रेन

*पहिल्या सफरीचा रूट – ‘Maharashtra Splendour’*
मुंबई – नाशिक – अजिंठा – वेरूळ – कोल्हापूर – गोवा – सावंतवाडी

आज जागतिक पर्यटन दिनी ही ट्रेन नाशिकमध्ये असणार आहे – गोदावरी, कुंभमेळा, वाईन टुरिझमचा संगम जगासमोर!

पहिल्याच सफरीत UK, USA, जपान, कॅनडा, मलेशिया येथील परदेशी पर्यटकांचा मोठा सहभाग आहे.

> “डेक्कन ओडिसी हा महाराष्ट्राचा वारसा जगासमोर मांडणारा ब्रँड आहे. QR कोडमुळे प्रवास अधिक माहितीपूर्ण झाला आहे.” – *नीलेश गटणे, MD, MTDC*

ही भेट पर्यटन मंत्री *शंभूराज देसाई*, राज्यमंत्री *इंद्रनील नाईक*, अपर मुख्य सचिव *संजय खंदारे* यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

#DeccanOdyssey #MTDC #WorldTourismDay #MaharashtraTourism #LuxuryTrain #MAIMEDIA24

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here