Home मुंबई *मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना*

*मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना*

6
0

*मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना*

मुंबई, दि. १३ – गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून आज दुसरी ‘मोदी एक्सप्रेस’ गणेशभक्तांना घेऊन कोकणच्या दिशेने रवाना झाली. दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ येथून मंत्री नितेश राणे यांनी झेंडा दाखवत विशेष रेल्वेला मार्गस्थ केले. यापूर्वी ११ सप्टेंबर रोजी पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणासाठी रवाना झाली होती.

गेली १४ वर्षे सातत्याने मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी ही विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करून दिली जात आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे आरक्षणासाठी होणारी धावपळ, तिकिटांची वाढती मागणी तसेच खासगी वाहनांचे वाढलेले भाडे या पार्श्वभूमीवर ‘मोदी एक्सप्रेस’ चाकरमान्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. मोफत प्रवासाची सुविधा आणि आरक्षित आसनव्यवस्थेमुळे गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुखकर होत आहे.

यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायणराव राणे आणि मंत्री नितेश राणे यांच्या जयजयकाराने दादर रेल्वे स्थानकाचा परिसर दुमदुमून गेला.

सलग १४ वर्षे कोकणवासीयांसाठी अविरतपणे सेवा देत असल्याबद्दल गणेशभक्त चाकरमान्यांनी मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here