*धुळ्याच्या औद्योगिक प्रगतीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल! ‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत २,४५२ कोटींचे करार*
आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी धुळे येथे आयोजित ‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद २०२६’ मध्ये उद्योजकांशी संवाद साधला.
या परिषदेत सुमारे २,४५२ कोटींचे MoUs करण्यात आले असून, त्यातून ३,६९३ प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगारनिर्मितीच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
धुळ्यात गुंतवणूक वाढली पाहिजे, उद्योग वाढले पाहिजेत आणि या उद्योगांमधून स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत, हा महायुती सरकारचा संकल्प आहे.
धुळ्याची औद्योगिक क्षमता, मजबूत कनेक्टिव्हिटी आणि उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करून जिल्ह्याला गुंतवणुकीचे नवे केंद्र बनविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी बोलताना सांगितले.





















