Home धुळे / नंदुरबार / जळगाव / अहिल्यानगर *गादिया विहार सोसायटीची कन्या शासकीय कोट्यातून एमबीबीएसला – माजी महापौर त्र्यंबकजी तुपे...

*गादिया विहार सोसायटीची कन्या शासकीय कोट्यातून एमबीबीएसला – माजी महापौर त्र्यंबकजी तुपे साहेबांच्या हस्ते सत्कार*

36
0

*गादिया विहार सोसायटीची कन्या शासकीय कोट्यातून एमबीबीएसला – माजी महापौर त्र्यंबकजी तुपे साहेबांच्या हस्ते सत्कार*

*छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) दि. २ सप्टेंबर -*

महानगरपालिका प्रभागातील *गादिया विहार सोसायटी* येथील रहिवाशी *कु. साक्षी संजय बोडखे* हिने NEET परीक्षेत घवघवीत यश संपादन करून *शासकीय कोट्यातून एमबीबीएस* ला प्रवेश मिळवला आहे.

सामान्य कुटुंबातून येऊन, जिद्द आणि अथक मेहनतीच्या जोरावर तिने हे यश खेचून आणले आहे. तिच्या या यशामुळे गादिया विहार सोसायटीसह संपूर्ण प्रभागात अभिमानाचे वातावरण आहे.

या यशाबद्दल प्रभागाचे लाडके नगरसेवक तथा *माजी महापौर मा. त्र्यंबकजी तुपे साहेब* यांच्या हस्ते तिचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जंगी सत्कार करण्यात आला.

*यावेळी तुपे साहेब म्हणाले:*
“गादिया विहार सोसायटीच्या लेकीने आमच्या प्रभागाचे नाव उंचावले आहे. शासकीय कोट्यातून MBBS ला नंबर लागणे सोपे नाही. ही आमच्या प्रभागातील सर्व मुलींसाठी प्रेरणा आहे. तिच्या पुढील वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा.”

*सत्काराला उत्तर देताना कु. साक्षी म्हणाली:*
“आई-वडिलांच्या कष्टामुळेच मी इथपर्यंत पोहोचले. मला गोरगरिबांची सेवा करणारी डॉक्टर व्हायचे.
कुमारी साक्षी संजय बोडखे हिच्या कौतुक अभिनंदन कार्यक्रम प्रसंगी गादिया विहार को ऑऑपरेटीव हौसिंग सोसायटीतील सन्मानिय सदस्य किशोर गोरक्षण जी लोहार साहेब, शेख नय्यर करीम जी शेख साहेब, एस के कुलकर्णी साहेब, शिवाजी भिवसनराव जी नलावडे सह सोसायटीतील गणमान्य सदस्य उपस्थित होते. शेवटी कुमारी सा॓क्षी यांचे वडील संजय विक्रम बोडखे व कुमारी साक्षी ची आई सौ गंगा संजय बोडखे यांचे अभिनंदन करुन समाजातील प्रत्येक आई वडिलांनी असेच संस्कार व शिस्त लावण्याची आज काळाची गरज बनली आहे. असे मनोगत आपल्या प्रभागा चे सन्मानिय लोकप्रिय नगरसेवक तथा माजी महापौर ञ्यंबकजी तुपे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here