Home मुंबई नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांसमोरील अडचणींच्या पार्श्वभूमीवर आज...

नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांसमोरील अडचणींच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी नंदुरबार जिल्हा शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित राहून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

22
0

जिल्ह्यातील परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही आणि पाठपुरावा करणार आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास माझे प्राधान्य राहील, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शिरीष चौधरी, शिवसेना नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख मा. विजयसिंग पराडके, जिल्हाप्रमुख ॲड. रामभैया रघुवंशी, नगराध्यक्षा सौ. रत्नाताई रघुवंशी, धडगाव नगराध्यक्ष धनसिंग दादा पावरा, महिला संपर्कप्रमुख सौ. कविता गावंडे, महिला जिल्हाप्रमुख सौ. ज्योती राजपूत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here