Home मुंबई *”IIT, IIM चे पेपर का फुटत नाहीत? MPSC चे का फुटतात?” –...

*”IIT, IIM चे पेपर का फुटत नाहीत? MPSC चे का फुटतात?” – सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल*

22
0

*”IIT, IIM चे पेपर का फुटत नाहीत? MPSC चे का फुटतात?” – सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल*

MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना सुप्रियाताई म्हणाल्या,

> *”मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, विषय अतिशय गंभीर आहे. MPSC विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावून तोडगा काढा. परीक्षा जगात होतात, IIT, IIM ची परीक्षा होते, तिथले पेपर का नाही फुटत? उलट AI मध्ये बारामती, सातारा, सांगलीचा शेतकरी उतरलाय, मग महाराष्ट्राच्या परीक्षांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर का होत नाही?”*

*रात्री १२.३० वाजताची हृदयद्रावक घटना सांगितली:*

“मला एका महिलेचा रात्री रडत फोन आला. ती MPSC च्या परीक्षेमुळे निराश होऊन आत्महत्येच्या विचारात होती. मी एक नागरिक म्हणून पोलिसांना स्क्रीनशॉट पाठवला. पोलिसांनी तिला समजावले. अशी एक केस नाही, सगळीकडे हीच परिस्थिती आहे. मुलं कष्ट करून मेरिटवर पास होण्याचा प्रयत्न करतायत, चूक यंत्रणेची आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

*इतर मुद्द्यांवर काय म्हणाल्या?*

*१. शेतकरी प्रश्नावर:* “आमच्या काळातही आत्महत्या झाल्या, पण शरद पवार साहेबांनी मनमोहन सिंग यांना घेऊन ७० हजार कोटींची सरसकट कर्जमाफी दिली. गणपती राया, सरकारला सुबुद्धी दे आणि यांच्या गाड्या दुष्काळग्रस्त ठिकाणी जाऊ देत.”

*२. राष्ट्रीय पुरस्कार सोहळा केवाडियात:* “दिल्ली ही देशाची राजधानी आहे, केंद्राशी संबंधित महत्त्वाचे कार्यक्रम दिल्लीतच होणे आवश्यक आहे.”

*३. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर:* “संजय राऊत हे देशातील मोठे नेते आहेत. मी या विषयावर बोलणार नाही. लोकांना आवडत नसेल तर मी बोलणार नाही.”

*४. गुटखाबंदीवर:* “अजितदादांनी आमच्या सरकारमध्ये गुटखाबंदी केली होती. मात्र अंमलबजावणी होत नसेल, तर देशासमोर काय प्रश्न आहेत आणि तुमचं काय चाललंय?”

सुप्रिया सुळे यांनी MPSC, महागाई, भ्रष्टाचार आणि पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी केली.

*वाचा सविस्तर: http://mai24news.in*

*#MPSC #SupriyaSule #MPSCStudents #Maharashtra #MaiMedia24*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here