Home वर्धा / भंडारा / गोंदिया / चंद्रपूर / गडचिरोली *शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – शिक्षणमंत्री दादाजी भुसे...

*शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही*

14
0

*शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही*

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही शिक्षक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदानाचे पवित्र कार्य निष्ठेने करत आहेत. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री *दादाजी भुसे* यांनी दिली.

गडचिरोली, दि. १० सप्टेंबर रोजी ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत भुसे यांनी जिल्ह्यातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यानंतर सामाजिक न्याय भवनात गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षक सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, CEO सुहास गाडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

*भुसे यांचे प्रमुख मुद्दे:*

*१. शाळा हे ज्ञानमंदिर:* “गावात मंदिरासाठी जसे सगळे एकत्र येतात, तसेच शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी लोकसहभागातून पुढे आले पाहिजे.”

*२. जीर्ण इमारतींचे तातडीने निर्लेखन:* शाळांमध्ये शुद्ध पाणी, स्वच्छतागृहे, क्रीडांगण, ई-लॅब, वाचनालय या सुविधा दर्जेदार असाव्यात. धोकादायक जुन्या इमारतींचे तातडीने निर्लेखन करून नवीन इमारतींचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हा नियोजन, CSR आणि मानव विकास मिशनमधून निधी उपलब्ध करणार.

*३. शिक्षक भरती:* पवित्र पोर्टलद्वारे पारदर्शक शिक्षक भरती सुरू असून लवकरच रिक्त जागा भरल्या जातील. केंद्रप्रमुखांच्या प्रलंबित पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावला आहे.

*४. थेट शाळा भेटी व संवाद:*
– *रामनगर पीएम श्री शाळा:* विद्यार्थ्यांचे वाचन, कविता गायन ऐकून कौतुक, वर्गखोल्यांची कमतरता दूर करण्याचे निर्देश.
– *जि.प. शाळा गोगाव:* वृक्षारोपण, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सोयींचा आढावा.
– *आदर्श शाळा बोदली:* विद्यार्थ्यांसोबत पोळा सण साजरा, विद्यार्थिनींकडून राखी बांधून घेतली, डिजिटल वर्गाची पाहणी, नादुरुस्त पॅनेल्स दुरुस्तीचे निर्देश.

*५. गुणवंतांचा गौरव:*
– *इस्रो सहल:* मोहुर्ली मॉडेल स्कूलची सन्ना शकील पठाण (बंगळुरू ISRO भेट व पहिला विमान प्रवास)
– *इन्स्पायर अवॉर्ड:* ध्रुव विनोद कोवे, देसाईगंज
– *राज्य विज्ञान मेळावा:* नमन पेदापल्लीवार, येनापूर (द्वितीय)
– *क्रीडा:* सॉफ्टबॉलपटू आभा संग्रामे, खो-खो ध्रुव हलामी, कबड्डी श्रवण उसेंडी यांच्यासह अनेक विद्यार्थी
– *आदर्श शिक्षक:* दिलीप नाकाडे, प्रवीण दोर्लीकर यांच्यासह आयडॉल शिक्षकांचा सन्मान.

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत राष्ट्रभक्ती आणि उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज असल्याचे भुसे यांनी सांगितले.

*वाचा सविस्तर: http://mai24news.in*

*#DadajiBhuse #Gadchiroli #ShaleyShikshan #ChalaShaletJauya #MaiMedia24*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here