*युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा – वडेट्टीवार यांची मागणी*
नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत गंभीर आणि चिंताजनक असल्याचे सांगत, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांची भेट घेऊन तातडीने निष्पक्ष आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे.
या संदर्भात वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ७ प्रमुख मागण्या केल्या आहेत.
*वडेट्टीवार यांच्या ७ प्रमुख मागण्या:*
*१.* हल्ल्याची तातडीने निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी.
*२.* हल्ल्यात सहभागी व्यक्तींविरुद्ध तातडीने FIR नोंदवून पुराव्यांच्या आधारे अटक करावी.
*३.* CCTV फुटेज, व्हिडिओ, फोटो, मोबाईल रेकॉर्डिंग व इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे तातडीने जतन करून तपासात समाविष्ट करावेत.
*४.* प्रत्यक्षदर्शी व संबंधित व्यक्तींचे जबाब कायदेशीर प्रक्रियेनुसार नोंदवावेत.
*५.* घटनेत इतर व्यक्तींचा सहभाग, चिथावणी किंवा पूर्वनियोजन आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी.
*६.* तपासाची प्रगती व कारवाईबाबत तक्रारदाराला नियमानुसार माहिती द्यावी.
*७.* राज्यातील शांततापूर्ण आंदोलने व राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
> “आंदोलन करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करणाऱ्या नागरिकांवर हल्ले होत असतील, तर हा लोकशाहीसाठी गंभीर इशारा आहे. दोषींवर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे,”
> असे काँग्रेस शिष्टमंडळाने म्हटले आहे.
*वाचा सविस्तर: http://mai24news.in*
*#ShivrajMore #VijayWadettiwar #YouthCongress #Nagpur #MaharashtraPolitics #MaiMedia24*
—






















