मेट्रोची कामे वेळेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा – डॉ. नीलम गोऱ्हे
*पुणे, दि. ९ -* खासदार *मुरलीधर मोहोळ* यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना नेत्या *डॉ. नीलम गोऱ्हे* यांनी मेट्रोची प्रलंबित कामे आणि जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
*डॉ. गोऱ्हे यांच्या प्रमुख सूचना:*
*१. मेट्रोबाबत:*
– प्रत्येक टप्प्याचे काम कालमर्यादेत पूर्ण करा
– मेट्रो, वाहतूक पोलीस, महापालिका आणि कंत्राटदारांनी संयुक्त वाहतूक आराखडा राबवावा
– पर्यायी मार्ग, दिशादर्शक फलक, सुरक्षित बॅरिकेडिंग आणि खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा
*२. जिल्हा परिषद शाळांबाबत:*
अभिजित दिपके यांच्या ‘स्कूल ठीक करो’ उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे म्हणाल्या – अधिकारी यांनी प्रत्यक्ष शाळांना भेटी द्याव्यात. वरिष्ठ आदेशाची वाट न पाहता शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतःहून शाळा तपासावी.
*तपासावे लागणारे मुद्दे:*
सुरक्षित वर्गखोल्या, पिण्याचे पाणी, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, वीजपुरवठा, संरक्षक भिंत, शिक्षकांची रिक्त पदे, शालेय पोषण आहाराचा दर्जा.
_”बैठकीत केवळ समस्या मांडून न थांबता प्रत्येक विषयावर कालमर्यादेत प्रत्यक्ष कार्यवाही झाली पाहिजे,”_ असा दमच डॉ. गोऱ्हे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
—





















