Home मुंबई शिक्षण* खासगी शिकवणी केंद्र नियमन कायद्याला मुदतवाढ; १५ सप्टेंबरपर्यंत सूचना-हरकती नोंदवता...

शिक्षण* खासगी शिकवणी केंद्र नियमन कायद्याला मुदतवाढ; १५ सप्टेंबरपर्यंत सूचना-हरकती नोंदवता येणार

29
0

शिक्षण*

खासगी शिकवणी केंद्र नियमन कायद्याला मुदतवाढ; १५ सप्टेंबरपर्यंत सूचना-हरकती नोंदवता येणार

*मुंबई, दि. ७ -* महाराष्ट्र खासगी शिकवणी केंद्र (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०२६ च्या मसुद्यावर जनतेकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या मसुद्यावर सूचना व हरकती नोंदवण्याची मुदत आता *१५ सप्टेंबर २०२६* पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षण संचालक (माध्यमिक) यांनी दिली.

शालेय शिक्षण विभागाने या कायद्याचा मसुदा मराठी व इंग्रजी भाषेत अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला होता. ७ सप्टेंबरपर्यंत या मसुद्यावर तब्बल *११ हजार ४१० सूचना व हरकती* प्राप्त झाल्या आहेत.

नागरिक, पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांचा अधिकाधिक सहभाग मिळावा व कायदा अधिक सर्वसमावेशक व्हावा यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

*सूचना कुठे पाठवायच्या?*
नागरिकांना आपल्या सूचना व हरकती लेखी स्वरूपात –
शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य किंवा
शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
यांच्याकडे पाठवता येणार आहेत. तसेच ई-मेलद्वारेही अभिप्राय सादर करता येणार आहे.

राज्यातील शिकवणी केंद्रांची नोंदणी, पारदर्शकता आणि गुणवत्ता निश्चित करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे विभागाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here