Home मुंबई *”एक जरी पुरावा दिला तर एक क्षणही पदावर राहणार नाही” – MPSC...

*”एक जरी पुरावा दिला तर एक क्षणही पदावर राहणार नाही” – MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांचे खुले आव्हान*

30
0

*”एक जरी पुरावा दिला तर एक क्षणही पदावर राहणार नाही” – MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांचे खुले आव्हान*

 

मुंबई – MPSC पेपरफुटी प्रकरणात आपल्यावर होत असलेल्या आरोपांवर अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी आज स्वयंस्पष्ट निवेदन जारी केले आहे.

“औषध निरीक्षक परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटीचा प्रकार मी रुजू होण्यापूर्वीचा आहे. तक्रार येताच पोलिसात तक्रार केली असून तपास सुरू आहे,” असे भीमनवार यांनी स्पष्ट केले आहे.

सतत वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे आरोप होत असल्याने व्यथित झालो आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आपल्या कार्यकाळात ८४ परीक्षा यशस्वी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. यात स्पर्धा परीक्षेच्या ८ आणि सरळसेवा भरतीच्या ७६ चाळणी परीक्षांचा समावेश आहे. १८ ते २१ दिवसांत निकाल जाहीर करण्यापर्यंत सुधारणा केल्याचे त्यांनी सांगितले.

पारदर्शी व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न करतोय, आणि कोणी एक जरी पुरावा दिला तर एक क्षणही पदावर राहणार नाही, असे कडक प्रतिपादन त्यांनी केले आहे.


*बॅनर लाईन:*
MPSC अध्यक्ष भीमनवारांचे खुले आव्हान
पुरावा द्या, मी लगेच राजीनामा देईन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here