*महाराष्ट्र बिडी कामगार सेनेच्या वतीने मातोश्री भवनात रक्षाबंधन साजरी*
*सोलापुर दि.२८/८/२०२६ *शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र बिडी कामगार सेनेच्या वतीने मुंबई येथील मातोश्री बंगल्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला*
*मातोश्री बंगल्यात झालेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात बिडी कामगार सेनेच्या वतीने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सिंहासनास पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले त्यानंतर मा.साहेब व बाळासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर बिडी कामगार सेनेचे रेखा म्हंता यांनी मा. उद्धव ठाकरेंंना राखी बांधले यावेळी उद्धव ठाकरेंनी बिडी उद्योगात चाललेल्या अस्थिर परिस्थितीची चौकशी करून बिडी उद्योग टिकण्यासाठी व कामगार जगण्यासाठी आणि बिडी कामगारांना किमान वेतन हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश दिले*
*शिवसेना उपनेते व सोलापूर जिल्हा कामगार सेनेचे प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज)यांच्या उपस्थितीत झालेल्या रक्षाबंधन कार्यक्रमाप्रसंगी विठ्ठल कुराडकर,रेखाताई आडकी, साक्षी आळगी, प्रीती आडकी,प्रेम आडकी, प्रथमेश आडकी यांच्यासह आदि उपस्थित होते*
Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *महाराष्ट्र बिडी कामगार सेनेच्या वतीने मातोश्री भवनात रक्षाबंधन साजरी*




















