*गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता: ‘तुळशी’ TBM द्वारे बोगदा खणन सुरू, ५.३०किमी दुहेरी बोगदा – अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांची पाहणी*
*मुंबई, दि. २६ ऑगस्ट:* गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (GMLR) प्रकल्प टप्पा ३ (ब) अंतर्गत गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड (पश्चिम) येथील अमर नगर दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली ‘तुळशी’ या टनेल बोरिंग मशीन (TBM) द्वारे ५.३० किलोमीटर लांबीचे, प्रत्येकी तीन मार्गिकेचे दुहेरी बोगदे बांधण्यात येत आहेत. यापैकी पहिले बोगदा खणन संयंत्र दि.१७ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यान्वित करण्यात आले आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी आज सकाळी प्रकल्प स्थळास भेट देऊन पाहणी केली.
*बांगर यांचे निर्देश:*
१. सद्यस्थितीत ९ मीटर लांबीचे खोदकाम पूर्ण – वेग कायम ठेवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ द्या
२. कामगारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करा
३ दुसऱ्या TBM चे ७०% असेंब्ली पूर्ण – ३०सप्टेंबर २०२६ पर्यंत संपूर्ण असेंब्ली पूर्ण करा
४. १ऑक्टोबर २०२६ पासून Site Acceptance Test (SAT) सुरू करा
प्रत्यक्ष बोगदा खणन सुरू झाल्याने प्रकल्पाने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यावेळी प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
*- MAI MEDIA 24, मुंबई*
*
























