Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर अरुण तीर्थक्षेत्राच्या भूसंपादनासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

अरुण तीर्थक्षेत्राच्या भूसंपादनासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

27
0

अरुण तीर्थक्षेत्राच्या भूसंपादनासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

सोलापूर : अरुण येथील श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी विकास आराखड्याला आता आणखी गती मिळणार आहे. तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाकरिता ग्रामविकास विभागामार्फत ९० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतीच अरुण तीर्थक्षेत्राची पाहणी करून विकासकामांचा आढावा घेतला होता. भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या होत्या.

तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातील विविध कामांसाठी भूसंपादनाची आवश्यकता असून, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निधीची मागणी केली होती. त्यानुसार वित्त विभागाच्या मान्यतेनंतर २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

या निधीमुळे भूसंपादनाची प्रक्रिया मार्गी लागण्यास मदत होणार असून, अरुण तीर्थक्षेत्रातील प्रस्तावित विकासकामांचा मार्गही मोकळा होणार आहे. भाविकांसाठी अधिक चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह तीर्थक्षेत्राचा नियोजित विकास करण्याला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

अरुण तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याने स्थानिक नागरिक आणि भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here