Home मुंबई त्या’ शेतकर्‍यांच्या वारसांना कर्ज मुक्तीचा लाभ द्या आमदार सतीश चव्हाण यांची...

त्या’ शेतकर्‍यांच्या वारसांना कर्ज मुक्तीचा लाभ द्या आमदार सतीश चव्हाण यांची सहकार मंत्र्यांकडे मागणी

27
0

त्या’ शेतकर्‍यांच्या वारसांना कर्ज मुक्तीचा लाभ द्या

आमदार सतीश चव्हाण यांची सहकार मंत्र्यांकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजनेत जे थकीत कर्जदार शेतकरी मयत झाले आहेत त्या शेतकर्‍यांच्या वारसांना कर्ज मुक्तीचा लाभ देण्यात यावा अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.18) सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली.

यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी आज मुंबई येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली. शासनाने सन 2026 मध्ये राज्यातील शेतकर्‍यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजना जाहीर केली. मात्र काही थकीत कर्जदार शेतकरी मयत झाले असल्याने सदरील शेतकर्‍यांकडे फार्मर आयडी नसल्याने मयत कर्जदार शेतकर्‍यांच्या सातबारा उतार्‍यावर कर्जाचा बोजा दिसणार आहे. त्यामुळे जे कर्जदार शेतकरी मयत झाले आहेत परंतु त्यांच्याकडे फार्मर आयडी नसल्याने त्यांच्या वारसांना कर्ज मुक्तीचा लाभ मिळण्यासाठी त्वरित योग्य ती कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी मंत्री महोदयांकडे केली.

याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप बनकर, बीडचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, गोविंद देशमुख, महेश उबाळे आदींची उपस्थिती होती.

फोटा कॅप्शन- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना निवेदन देताना आमदार सतीश चव्हाण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here