https://x.com/VijayWadettiwar/status/2089972999588020421
सत्ताधाऱ्यांनो, तुम्ही निवांत राहा…ही तुमची मुलगी नाही! – विजय वडेट्टीवार
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या नसरापूरच्या घटनेनंतर आता जुन्नर तालुक्यातील पिंपळवडी येथे एका निष्पाप चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. अशा क्रूर आणि विकृत घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात वारंवार घडत असताना राज्यकर्ते सुस्त आहेत, याची लाज वाटते.
नरसापूर प्रकरणानंतर आज पुन्हा एका निष्पाप चिमुकलीचा जीव गेला. यावरून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून गुन्हेगारांना काडीचाही धाक उरलेला नाही. रोज महिला आणि निष्पाप मुलींवर अत्याचार होत असताना गृहखाते नेमकं काय करतंय? या प्रकरणातील विकृत नराधमाला तातडीने बेड्या ठोकून, नसरापूर प्रकरणातील आरोपीविरुद्ध ज्याप्रमाणे १६ दिवसांत आरोपपत्र दाखल करून विशेष न्यायालयामार्फत फाशीची शिक्षा सुनावली गेली, तसाच जलद न्याय जुन्नरच्या निष्पाप चिमुकलीला आणि तिच्या पीडित कुटुंबाला मिळाला पाहिजे.
या घटनेतील मृत चिमुकलीच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तिच्या कुटुंबियांच्या या कठीण दुःखात आम्ही सहभागी आहोत.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@SunetraA_Pawar
@mieknathshinde





















