मुंबई,
विधान भवन, मुंबई येथे आज भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या शुभहस्ते, महाराष्ट्र विधानपरिषदेचे उप सभापती सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) जितेंद्र भोळे, सचिव (३) डॉ.विलास आठवले, सचिव (४) शिवदर्शन साठ्ये, सभापती यांचे सचिव पंडित खेडकर यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी डॉ. राजू भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.
स्वातंत्र्यदिन पूर्वसंध्येपासून विधानमंडळाच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूला करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने या वास्तूचे सौंदर्य उजळून निघाले आहे.
*****





















